बातम्या
एक राखी सीमेवरील जवानांसाठी
By nisha patil - 8/27/2023 1:20:12 PM
Share This News:
एनसीसीच्या एअर रिंग आणि आर्मी बटालियन यांचा प्रामुख्याने यामध्ये उपक्रमामध्ये समावेश होता. विशेष करून तिरंगा आणि चंद्रयान यासारख्या राख्या यावर्षीच्या आकर्षण ठरल्या. अनेक विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी या राखीव संदेश लिहिलेले आहेत. कला विभाग प्रमुख प्रशांत जाधव आणि विश्वास शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना डेळेकर उपमुख्याध्यापक गिरीश जांभळीकर पर्यवेक्षक प्रसन्न जोशी जिमखाना प्रमुख संतोष गणबावले तसेच राजेंद्र जाधव रोहित कुंभार यांचे या स्पर्धेसाठी विशेष योगदान लाभले.. शुक्रवार दिनांक 25 आणि शनिवार दिनांक 2६ तारखेला या राख्या विद्यार्थ्यांनी प्रशालेत तयार केल्या याप्रसंगी पालक शिक्षक यात सहभागी झाले सर्व राख्या सीमेवरील जवानासाठी एकत्रित करून सन्मानपूर्वक पाठवली जाणार आहेत.. एकूण नऊशे विविध प्रकारच्या राख्या संकलित झाल्या असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची व आपल्या सीमेवरील जवानांना बंधू भावाच्या प्रेमाची राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा मिळाली.
एक राखी सीमेवरील जवानांसाठी
|