बातम्या

हणमंतवाडी येथे डोक्यात ओंडका घातल्याने एक गंभीर

One serious due to head injury at Hanmantwadi


By nisha patil - 3/28/2024 8:02:29 PM
Share This News:



करवीर तालुक्यातील हणमंतवाडी इथ मधली गल्ली परिसरात तीबिले आणि झांजगे कुटुंबीय शेजारी शेजारी राहतात.बुधवारी रात्री बळवंत महादेव  झांजगे आणि जखमी बंडोपंत बापू तिबीले हे त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या गायकवाड यांच्या घरी आयपीएल क्रिकेट सामना टिव्हीवर पहात बसले होते.त्यावेळी बळवंत झांजगे आणि बंडोपंत तीबिले यांच्यात किरकोळ वाद झाला.यानंतर ते दोघे बाहेर आले.दरम्यान बळवंत झांजगे यांचा पुतण्या सागर झांजगे याने आपल्या चुलत्यास का शिवीगाळ करतोस अशी विचारणा करत लाकडी ओंडंका उचलून बंडोपंत तिविले यांच्या डोक्यात घातला यात बंडोपंत बापू तिबिले गभिर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर इथ उपचार सुरु असून  करवीर पोलिसांनी या प्रकरणी सागर सदाशिव झांजगे आणि बळवंत महादेव झांजगे या दोघा चुलत्या पुंतण्यला अटक केलीय.


हणमंतवाडी येथे डोक्यात ओंडका घातल्याने एक गंभीर