बातम्या
कांदाप्रश्नी दिल्लीत आज महत्वाची बैठक
By nisha patil - 9/29/2023 5:18:45 PM
Share This News:
कांद्यावर लावण्यात आलेले 40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करावे या मुद्यांवरुन आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी बैठक बोलावली होती मात्र वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीकडे महाराष्ट्रातून जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाल्या की,कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची असून , या बैठकीसाठी प्रमुख कांदा उत्पादक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मंत्री यांना आमंत्रित केले की नाही याचे उत्तर राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. जर आमंत्रित करुन देखील ते बैठकीला गेले नसतील, तर या बैठकीकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रावदी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली तसेच केंद्र शासनाच्या असंवेदनशील धोरणामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत . तसेच राज्यातील कांदा उत्पादकांची बाजू केंद्रात जोरकसपणे मांडण्यासाठी महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांनी जाणे आवश्यक होते. परंतू या बैठकीला ते उपस्थित नसणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कांदाप्रश्नी दिल्लीत आज महत्वाची बैठक
|