बातम्या

शेतकऱ्यांना कांद्याने पुन्हा रडवलं...!

Onion made farmers cry again


By nisha patil - 1/25/2024 7:44:43 PM
Share This News:



सोलापूर,  | कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत आहे. निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे दर आता हजाराच्या खाली आले आहे. कांदा आता सात महिन्यानंतर नीच्चांकी दरावर आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता हजार ते १२०० रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांदा पिकातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे कांद्यावर लादलेली निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जात आहे.

येवला बाजारात घसरण
येवला बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळत आहे. कांद्याचे सरासरी भाव 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटलवर आले आहे. गेल्या आठवड्यात 1600 रुपये तर आज सरासरी 800 ते 950 रुपये भाव मिळत असल्याने कांदा तोट्यात विक्री करावा लागत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांद्याला जास्तीत जास्त 1065 सरासरी 950 तर कमीत कमी 400 रुपये बाजार भाव मिळाला आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव घसरत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी देखील कांदा व्यापारी करताना दिसत आहे.

सोलापुरात शेतकरी आक्रमक
सोलापुरात कांद्याचे दर घसरले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरच रस्त्यावर कांदा फेकत निषेध केला. तसेच शेतकरी बाजार समितीच्या गेट समोर आंदोलन करत आहे. कांद्याला 1 ते 2 रुपयेपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. बाजारात कांदा विक्रीसाठी आणल्यानंतर कवडीमोल भाव मिळत आहे.


शेतकऱ्यांना कांद्याने पुन्हा रडवलं...!