बातम्या
महाराष्ट्रात कांदयाचे दर घसरला
By nisha patil - 12/16/2023 5:14:22 PM
Share This News:
कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने गेल्या आठवड्यात कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी बाजार भाव दोन हजार रुपयांच्या आत आले आहे. येवला बाजार समितीत कांद्याला पंधराशे रुपये सरासरी बाजार भाव जरी मिळत असेल तरी बाराशे ते तेराशे रुपये कांद्याची खरेदी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरण असताना निर्यात बंदीचा फटका अनेक देशांना बसला आहे. नेपाळमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो 200 तर श्रीलंकेत 300 रुपये किलोवर गेले आहे.
एकीकडे भारतात कांद्याचे दर घसरत असताना इतर देशांमध्ये कांद्याचे दर वाढत आहे. गेल्या दहा दिवसांत नेपाळमध्ये कांद्याचे दर दुप्पट झाले आहे. दहा दिवसांपूर्वी नेपाळमध्ये शंभर रुपये प्रतिकिलो मिळणार कांदा आता दोनशे रुपये किलोंवर गेला आहे.
महाराष्ट्रात कांदयाचे दर घसरला
|