बातम्या
राज्यात कांद्याचे भाव पोहचले निम्म्यावर! शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळेना, ग्राहक मात्र जाम खूश
By nisha patil - 12/21/2023 7:06:44 PM
Share This News:
राज्यात कांद्याचे भाव पोहचले निम्म्यावर! शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळेना, ग्राहक मात्र जाम खूश
कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आता सर्व राज्यात दिसून येत आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यापासून 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत कांद्याचे भाव अक्षरशा निम्म्यावर पोहचले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु कांदाचा दर इतका घसरल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाल्याच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कांदा निर्यात राज्यांमधे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करूनही सरकारवर त्याचा काही परिणाम झालेला दिसून येत नाही.
केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे भाव जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत. येत्या आठवड्यात किमती स्थिर राहतील किंवा किंचित कमी होतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले. लासलगाव एएमपीसी येथे कांद्याची सरासरी घाऊक किंमत 20-21 रुपये प्रति किलोवर गेली आहे, जी निर्यातबंदी लागू होण्यापूर्वी 39-40 रुपये प्रति किलो होती.
ग्राहक खूश पण शेतकरी चिंतेत
7 डिसेंबरपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरीराजा मात्र चिंतेत आहेत. कांदा निर्यातबंदीनंतर लासलगाव व नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरण्यास सुरुवात झाली. कांद्याचा भाव 3,000 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलवरून 1,500 रुपये प्रति क्विंटलवर आला आहे. काही बाजारांमध्ये तर कांद्याचे दर इतके घसरत आहेत की उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
राज्यात कांद्याचे भाव पोहचले निम्म्यावर! शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळेना, ग्राहक मात्र जाम खूश
|