बातम्या

पाणी पुरवठा योजनेचे ऑनलाईन उद्घाटन

Online Inauguration of Water Supply Scheme


By nisha patil - 7/14/2023 5:24:23 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.कोल्हापूर (गोकुळ)चां भाग असणारी सॅटॅलाइट डेअरी उदगाव शिरोळ येथे पाणी पुरवठा योजनेचे ऑनलाईन उद्घाटन माजी मंत्री राजेंद्र पाटील यांचा सुपुत्र आदित्य पाटील, चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक डॉ सुजित मिणचेकर यांच्या उपस्थित पार पडला.

तसेच पाणी पुरवठा उद्घाटन व शिरोळ तालुका प्राथमिक दूध संस्थाचा संपर्क मेळाव्याचे स्वागत मा.आम.डॉ सुजित मिणचेकर (संचालक गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यानी केले. व आभार संचालक बाबासाहेब चौगुले यांनी मानले.

मेळावा व उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी संचालक विश्वास पाटील,अजित नरके ,संभाजी पाटील,शशिकांत चूयेकर- पाटील, कर्णसिंह गायकवाड,बाबासाहेब चौगुले, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील,बाळासाहेब खाडे, अंबरिषसिह घाडगे,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,तसेच गोकुळ संघाचे अधिकारी व दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


पाणी पुरवठा योजनेचे ऑनलाईन उद्घाटन