बातम्या

हज यात्रा 2025 साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

Online application for Hajj Yatra 2025 has started


By nisha patil - 8/14/2024 4:11:40 PM
Share This News:



कोल्हापूर / भारतीय हज समिती आणि महाराष्ट्र राज्य हज समितीच्या वतीने 13 ऑगस्ट पासून हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील या यात्रेसाठी जाण्यास इच्छुक स्त्री पुरुष हज यात्रेकरूंसाठी मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती हज फौंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर आणि लिमरास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी इक्बाल देसाई यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी डिसेंबर 2026 पर्यंत वैध असणाऱ्या पासपोर्टच्या छायांकित प्रति,पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत फोटो (ज्यामध्ये मागील बाजू पांढऱ्या रंगाची असेल आणि समोरून दोन्ही कान दिसतील ), तसेच दोन नातेवाईकांचे आधारकार्ड,त्यांचे मोबाईल क्रमांक,पॅन कार्ड ,आधारकार्डच्या छायांकित प्रति आशा कागदपत्रांसह 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुस्लिम बोर्डिंग मध्ये उपस्थित रहावे असे हज फौंडेशन आणि लिमरास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा,गडहिंग्लज, पेठ वडगाव,चंदगड, इचलकरंजी, जयसिंगपुर, कुरुंदवाड याठिकाणी सुद्धा हज यात्रेकरूंचे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.


हज यात्रा 2025 साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात