बातम्या

चौगुले कॉलेजमध्ये आॅनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

Online international seminar concluded in Chaugule College


By nisha patil - 4/30/2024 5:28:28 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये आॅनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न.

मानवी मूल्ये व नैतिकता अत्यंत महत्त्वाची आहे.महात्मा गांधी यांनी स्त्रियांना स्वातंत्र्य संग्रामामध्ये  सहभागी करून घेतले स्त्री सबलीकरण हे खऱ्या अर्थाने त्यापासून सुरू झाले आहे.पूर्वी स्त्रियांना संधी मिळत नव्हती त्यांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी त्यांनी इंदिरा गांधी यांचे उदाहरण दिले समाजशास्त्रीय व अर्थशास्त्रीय विचारवंतांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.स्त्रियांचा छळ थांबला पाहिजे त्यांना मानसिक आणि आर्थिक स्वावलंबन मिळाले पाहिजे.सशक्त लोकशाहीसाठी महिला सबलीकरण असणे अत्यंत गरजेचे आहे.महिला सबलीकरणासाठी संसाधनांमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे महिला सबलीकरण हे फक्त चर्चेचा विषय नसून ते मानवी जीवनातील मूल्य आहे त्यासाठी महिलांना समान संधी मिळाली पाहिजे असे प्रतिपादन सॅलीसबरी विद्यापीठ,यु.एस.ए.येथील डॉ.प्रवीण सप्तर्षी यांनी केले.

श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व ग्लोबल फौंडेशन,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "महिला सबलीकरण" या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करताना डॉ. प्रवीण सप्तर्षी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन.रावण होते.

यावेळी राॅयल ग्लोबल विद्यापीठ,गुहावटी येथील डॉ.तृष्टी शर्मा,अलकुद ओपन विद्यापीठ,पॅलेस्टीनिअन टेरिटरी येथील डॉ.मुंथर मुहद इब्राहिम जाॅन्ड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सेशन अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल चौगुले,डॉ.संतोष कदम,डॉ.शार्दुल सेलूकर यांनी काम पाहिले.

या आॅनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले,संस्था सचिव शिवाजीराव पाटील,डॉ.अजय चौगुले,प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या आॅनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक म्हणून प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील व सहसमन्वयक म्हणून डॉ.यु.एन.लाड यांनी काम पाहिले. या आॅनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात विविध देशांतील संशोधक,प्राध्यापक,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनींनी संशोधन पेपरचे वाचन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.भारती शिंदे यांनी केले आभार प्रा.पी.डी.माने यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.टी.एस.कवठेकर यांनी केले.
 


चौगुले कॉलेजमध्ये आॅनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न