बातम्या
नव्या वर्षात शिव शाहू चरित्राचा ऑनलाइन अभ्यासाला सुरुवात
By nisha patil - 1/1/2024 2:51:18 PM
Share This News:
नव्या वर्षात शिव शाहू चरित्राचा ऑनलाइन अभ्यासाला सुरुवात
शिव शाहू चरित्रातून मिळणार विद्यार्थ्यांना नवी दिशा
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन कार्य, विचार सदैव प्रेरणादायी ,स्मृति देणारे आहेत. ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवाजी विद्यापीठ नव्या वर्षात दोन ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणार आहे. त्याद्वारे शिवशाहीच्या चरित्राचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना आयुष्यात नवीन दिशा मिळवता येणार आहे.
शिव शाहूंच्या जीवनकार्यात अनेक स्मृतिदायक पैलू आहेत. ते जगभरातील विद्यार्थ्यांना अभ्यासात यावे या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने मिसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धा बंदी आणि राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाची औचित्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज जीवन परिचय आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जीवन आणि कार्य असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. साधारणतः तीन महिन्याच्या कालावधीचे हे अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. नव्या वर्षातील शैक्षणिक क्षेत्रात जून पासून या अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे.
छत्रपती शिवरायांनी केलेली स्वराज्याची स्थापना, त्यांची युद्धनीती, अर्थनीती, राष्ट्र उभारण्यातील योगदान, त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व त्यांनी केलेल्या किल्ल्यांची बांधणी, आरमाराची स्थापना, मराठा इतिहास, आदींचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करता येणार आहे. राजश्री शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक, उद्योग कला ,क्रीडा कृषी, आदी क्षेत्रातील कार्य आणि योगदान अभ्यासात येणार आहे या दोन्ही अभ्यासक्रमातून शिवशाहीचे विचार देखील विद्यार्थ्यांना समजून घेता येणार आहेत त्यासाठी या विविध पैलूंची मांडणी तज्ञ अभ्यासक इतिहास संशोधक व्हिडिओच्या माध्यमातून करणार असल्याचे विद्यापीठातील इतिहास अधि विभागाचे प्रमुख डॉक्टर अविनाश पाटील यांनी सांगितले.
नव्या वर्षात शिव शाहू चरित्राचा ऑनलाइन अभ्यासाला सुरुवात
|