बातम्या

हातकणंगले व कोल्हापूरमधून शिवसेनाच लढणार : उदय सामंत

Only Shiv Sena will fight from Hatkanangle and Kolhapur Uday Samant


By nisha patil - 3/1/2024 2:22:20 PM
Share This News:



हातकणंगले व कोल्हापूरमधून शिवसेनाच लढणार : उदय सामंत

कोल्हापूर: राज्यातील लोकसभेच्या 48 मतदार संघावर कोणीही दावा करू शकतो मात्र हातकलंगले कोल्हापूरमध्ये दोन्ही विद्यमान खासदार आमचे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनाच लढणार आहे. तसा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. महायुती सर्व जागा जिंकेल आणि विरोधक भुई सपाट होतील असा दावा उद्योग मंत्री उदय संबंध यांनी केला.
   

शिव संकल्प अभियानाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी उद्योग मंत्री म्हणाले. ज्या ठिकाणी यापूर्वी आमचे खासदार निवडून आले आहेत, आम्ही जागा लढवला आहेत त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री शिवसंकल्पाद्वारे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपने जा रत्नागिरी सिंधुदुर्ग वर दावा केला आहे. ती जागा शिवसेनेची असून त्या ठिकाणी आम्ही लढलो आहोत तेथे शिवसेनेला मताधिक्य आहे. त्यामुळे त्यावर आमचा दावा आहे. महायुतीमध्ये कोणी स्वयंघोषित नाही. त्यामुळे जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार हे नेते योग्य निर्णय घेतील.
 

   मनोज जरांगे पाटील हे समुजतदार आणि मराठा समाजाला न्याय देणारे नेते आहेत. त्यांच्या मागणीनुसार कोणीही दाखले देण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील लोकसंख्या त्या ठिकाणी रोज येणारे लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन ते आंदोलनाबाबत योग्य निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री आहे. मुंबईतील लोकसंख्या त्या ठिकाणी रोज येणारे लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन ते आंदोलनाबाबत योग्य निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री आहे. इम्पेरियल डेटा जमा करण्याचे काम राज्य मागासवर्गीय आयोगाकडून युद्धपातेवर सुरू आहे. आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन कायदा करायला आम्ही तयार आहोत. कोकण प्रांतामधील मराठा समाजातील लोकांची आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारी योग विचार करेल, फील्डवर जाणारे आमचे मुख्यमंत्री कोणाच्या काळात भ्रष्टाचार करत ज्यांनी मेलेल्या लोकांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहेत त्यांनी आम्हाला सांगू नये अशी टीका खासदार संजय राऊत यांच्यावर उद्योग  मंत्री सामंत यांनी केली. जे सरकार लोकांमध्ये जाऊन काम करते त्याला लोक मतदान करतात आमचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह वरून शुभेच्छा देत नाहीत ते फिल्डवर जाऊन काम करतात असेही ते म्हणाले.


हातकणंगले व कोल्हापूरमधून शिवसेनाच लढणार : उदय सामंत