बातम्या

तरच सतेज पाटील आणि आम्ही मित्र म्हणून राहू:मंत्री हसन मुश्रीफ

Only then will Satej Patil and we remain friends


By nisha patil - 7/14/2023 5:50:25 PM
Share This News:



तरच सतेज पाटील आणि आम्ही मित्र म्हणून राहू:मंत्री हसन मुश्रीफ

 राज्यात सलग दुसऱ्यांदा झालेल्या राजकीय भूकंपानंतर कोल्हापूरच्या राजकारणाचा चिखल होऊन गेला असतानाच आता बंडखोर कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या राजकीय वक्तव्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. मुश्रीफ यांनी आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला महायुतीसोबत राहावं लागेल, असे स्पष्ट करताना सतेज पाटील यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवरही भाष्य केले. त्यामुळे कोल्हापूर राजकारणात आणखी खिचडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.मंत्री हसन मुश्रीफ आज  कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना स्थानिक राजकारणावर भाष्य केले. त्याचबरोबर खातेवाटपावरही भाष्य केले. ते म्हणाले की, पुढील काही तासांमध्ये खातेवाटप झालेलं असेल. कोणाला कोणतं खातं मिळालं हे तुम्हाला लवकरच कळेल. शरद पवार आमचं दैवत असल्याचा पुनरुच्चार मुश्रीफ यांनी केला. 

मुश्रीफ यांनी सांगितले की, आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला महायुती सोबत राहावं लागेल. सतेज पाटील महायुतीमध्ये आले तरच आम्ही त्यांच्यासोबत मित्र म्हणून राहू. मी खासगीत त्यांना आमच्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे, असा मोठा गौप्यस्फोट मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूर राजकारणात मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची जय वीरु अशीच ओळख आहे. त्यामुळे आता मुश्रीफ बंडखोर झाल्याने मैत्रीतही बंड होणार का? अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महाविकास आघाडी पॅटर्न या जोडीने राज्यात प्रथमच कोल्हापूर मनपा राबवला होता. गोकुळमध्येही पाटील-मुश्रीफ गटाची सत्ता आहे. जिल्हा बँक, बाजार समितीमध्येही दोघे एकत्र आहेत.


तरच सतेज पाटील आणि आम्ही मित्र म्हणून राहू:मंत्री हसन मुश्रीफ