बातम्या

तरच काम सुरु करणार: टिप्परचालकांचा पवित्रा

Only then will work begin Attitude of tipper drivers


By nisha patil - 6/26/2023 4:13:38 PM
Share This News:



कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर वाहनाचे वाहनचालक कंत्राटीपद्धतीने महापालिकेला सेवा देतात. प्रिंसिपल एम्प्लॉयर म्हणून टिप्पर चालकांना किमान वेतन देणे महापालिकेस बंधनकारक असून देखील त्याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. किमान वेतनच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली गेल्या मार्च पासून साततत्याने आंदोलन सुरु होते. अखेर तत्कालीन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महापालिकेने सहा जून शिवराज्याभिषेक दिनादिवशी किमान वेतन लागू करण्यासाठी नवीन टेंडर जाहीर करू असे आश्वासन दिले होते. तसेच एप्रिल 2023 पासून किमान वेतनाचा फरक देखील जमा करावा अशी मागणी चालकांकडून केली गेली होती. परंतु याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत असल्याने टिप्परचालकांनी शनिवार पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
दोन्ही कंत्राटदारांकडे काम करत असलेले सर्व टिप्परचालक काम बंद करणार असून टेंडर जाहीर होऊ पर्यंत कामावर परत न येण्याचा निर्णय टिप्परचालकांनी घेतला असल्याचे आप चे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.दरम्यान आज  आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांना गाड्या काढायला लावल्या.परंतु सकाळी 169 पैकी फक्त 30 एक गाड्या निघू शकल्या.यावेळी आंदोलक टिप्परचालकांनी बाहेर पडत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करत आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले.


तरच काम सुरु करणार: टिप्परचालकांचा पवित्रा