बातम्या

त्वचेचे सौंदर्य खुलवा, अंड्याचा ‘या’ ४ पद्धतीने करा वापर !

Open the beauty of the skin


By nisha patil - 7/3/2024 7:41:10 AM
Share This News:



सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारातील माहागडी सौंदर्य प्रसाधने वापरणे काहीवेळा न परवडणारे असते. तर कधीकधी यातील रसायनांमुळे साईड इफेक्टही होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. या उपायामुळे खुपच चांगला परिणाम दिसून येतो. अंड्याचा वापर करून सौंदर्य कसे वाढवावे ते जाणून घेवूयात.

हे उपाय करा
१ त्वचा फ्रेश आणि मुलायम होण्यासाठी एक अंडे फेटून घ्या. त्यानंतर ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. मिश्रण सुकल्यावर गरम पाण्याने धुवून घ्या.

२ ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावा. हा लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.


३ चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यामध्ये थोडे कॉर्नफ्लॉवर घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. जेव्हा चेहऱ्यावर लावलेला हा मास्क सुकून जाईल त्यावेळी हळूहळू तो चेहऱ्यावरून काढा. नको असलेले केस निघून जातील आणि त्वचा मुलायम होईल.

४ तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठीही अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावा. तो सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्या.


त्वचेचे सौंदर्य खुलवा, अंड्याचा ‘या’ ४ पद्धतीने करा वापर !