बातम्या

संभाजी भिडेंविरोधात विधानसभेत विरोधक आक्रमक

Opposition aggressive in assembly against Sambhaji Bhide


By nisha patil - 2/8/2023 8:31:08 PM
Share This News:



महात्मा गांधीसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात संभाजी भिडेंविरोधात सध्या राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे.संभाजी भिडेंच्या अटकेसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ सुरू आहे. संभाजी भिडेंविरोधात विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. सभागृहात भिडे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतच संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भिडे यांना असेल तिथून उचलून अटक केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.संभाजी भिडे बोगस माणूस आहे. अनेक ठिकाणी जाऊन राज्यातील समाजसेवक आणि देव देवतांवर वादग्रस्त वक्तव्य  केले आहे. तसेच  खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो आणि हा माणूस मोकाट फिरत आहे. भिडे मुक्तपणे वावरत आहे त्याला पोलीस संरक्षण दिले गेलंय. ज्या अर्थी सरकार कुठलीही कारवाई करत नाही त्यामागे पोलिसांचे संरक्षण त्याला मिळालेलं आहे. या माणसाला एवढं संरक्षण कसे मिळते निवडणुकीला फायदा करून घेण्यासाठी हे उदयोग सुरू नाहीत ना? असा सवाल  पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला.  पृथ्वीराज चव्हाणांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. भिडे यांना कोणतीही सुरक्षा पुरवली नसल्याचे फडणवीस म्हणाले.राष्ट्रवादीते जितेंद्र आव्हाड म्हणाले, भिडेंबद्दल आज चर्चा झाली, पण जास्त झाली नाही. महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याविषयी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली.पंडित नेहरू यांचा काही योगदान देशासाठी नव्हतं त्यांचा कुटुंब मुसलमान होत असे भिडे म्हणाले.  एवढच नाही तर  15 ऑगस्ट हा भारताचा स्वतंत्र दिन नाही असेही ते म्हणाले. अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला  हे सगळ्यात मोठे समाजसुधारक म्हणतात. वादग्रस्त वक्तव्यांनंतर देखील  अटक होत नाही. संभाजी भिडेला राजाश्रय मिळाला आहे. महाराष्ट्र हातातून जात असताना दंगली घडाव्यात अशी त्यांची इच्छा असावी म्हणून त्यांना पाठीशी घातलं जात असेल. भिंडेची स्वतः  ठाण्याला तक्रार केली आहे. 

संभाजी भिंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही थांबता थांबत नाही. आधी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, त्यानंतर आता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लीम होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले .  या प्रकारानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताप व्यक्त करून संभाजी भिडे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हे दाखल झाले आहेत.


संभाजी भिडेंविरोधात विधानसभेत विरोधक आक्रमक