बातम्या

राजेंद्र वरपे कुटुंबियांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली भेट

Opposition leader Ambadas Danve met Rajendra Varpes family


By nisha patil - 8/2/2024 7:57:06 PM
Share This News:



राजेंद्र वरपे कुटुंबियांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली भेट

कोल्हापूर जिल्ह्यातील जनाधिकार जनता दरबारात ५६ प्रकरण ऑन द स्पॉट निकाली

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली अंध मुलामुलींची भेट
पुर्नवसनासाठी भूखंड मिळवून करणार पुर्नवसन

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथील छत्रपती शाहू सभागृहात आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतलेल्या आठव्या जनाधिकार जनता दरबाराला कोल्हापूरकरांनी मोठया संख्येने उपस्थिती लावत आपल्या व्यथा मांडल्या. या जनता दरबारात ३३० निवेदन प्राप्त झाली असून ५६ जणांचे प्रश्न ऑन द स्पॉट निकाली काढण्यात यश आले.  सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या  शासकीय जाहिराती करतो मात्र नागरिकांच्या   व्यथा शासनाच्या कानी येत नसल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जनाधिकार जनतेच्या हक्काचा जनता दरबार कार्यक्रम हाती घेतला जात असल्याचे दानवे म्हणाले.
 

  या जनता दरबारात हर घर नल योजना, पाणी पुरवठा योजना, चांदोली प्रकल्पबाधित, 
प्राण्यांमुळे होत असलेले शेतीचे नुकसान, शेतीला दिवसा वीज पुरवठा तसेच विविध प्रश्न व समस्या मांडण्यात आल्या. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या अधिकारी वर्गासोबत या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.


वरपे कुटुंबिय घटनेप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना विचारला जाब
राजेंद्र वरपे कुटुंबियांची घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली भेट
 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज कोल्हापुरात जनता दरबार घेतला. यावेळी राजेंद्र वरपे यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगत पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार अंबादास दानवे यांच्याकडे केली. यानंतर अंबादास दानवे यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधिक्षकांना फोन करुन जाब विचारला. या घटनेबाबत वरपे यांची जवाब नोंदवून गुन्हा नोंदवण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. 
   

संध्याकाळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजेंद्र वरपे यांच्या घरी भेट देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वरपे कुटुंबियांसोबत असल्याचे आश्वासन दानवे यांनी दिले. 


विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली अंध मुलामुलींची भेट पुर्नवसनासाठी भूखंड मिळवून करणार पुर्नवसन विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची ग्वाही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अंध युवक मंच, हणबरवाडी यासंस्थेने पूर्णतः पुर्नवसन व्हावे यासाठी रिकामा भूखंड मिळावा  यामागणीकरिता सतत कोल्हापूर पालिका स्तरावर पाठपुरावा करत आहेत. आज त्यांची दखल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूर येथे आयोजित जनता दरबारात घेतली, आणि पालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याशी संपर्क साधला.
      अंध मुलामुलींची भेट घेत त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबतही दानवे यांनी जातीने विचारपूस केली. या संस्थेला भूखंड मिळवून देणारच, अशी ग्वाही यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संस्थेचे संचालक संजय ढेंगे यांना दिली.

श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी विरोधी अंबादास दानवे नतमस्तक
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. श्री महालक्ष्मी देवी ऊर्जेची स्रोत आहे, तिच्याकडून ऊर्जा प्राप्त होऊन ती आमच्या शिवसेनेला मिळो, आमच्या रगारगामध्ये ती शक्ती देवो, जेणेकरून आम्ही महिषासुरांचा नायनाट करू शकू, अशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  आज देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली.


  यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, सुनील शिंत्रे, वैभव उगळे, संजय चौगले, महाराष्ट्र राज्य संघटक चंगेज खान पठाण, माजी आमदार उल्हास दादा पाटील, डॉ. सुजित मिंचेकर, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, हाजी अस्लम सय्यद शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, सुनील मोदी, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, विशास देवखुळे, महिला जिल्हाप्रमुख शुभांगी पवार, मंगल सावंत, उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत, महिला आघाडी डॉ अरुणा माळी उपस्थित होते.


राजेंद्र वरपे कुटुंबियांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली भेट