बातम्या

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली अंध मुलामुलींची भेट

Opposition leader Ambadas Danve met the blind children


By nisha patil - 8/2/2024 10:41:18 PM
Share This News:



विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली अंध मुलामुलींची भेट
पुर्नवसनासाठी भूखंड मिळवून करणार पुर्नवसन
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची ग्वाही

 

कोल्हापूर - दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अंध युवक मंच, हणबरवाडी यासंस्थेने पूर्णतः पुर्नवसन व्हावे यासाठी रिकामा भूखंड मिळावा  यामागणीकरिता सतत कोल्हापूर पालिका स्तरावर पाठपुरावा करत आहेत. आज त्यांची दखल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूर येथे आयोजित जनता दरबारात घेतली, आणि पालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याशी संपर्क साधला.
     

अंध मुलामुलींची भेट घेत त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबतही दानवे यांनी जातीने विचारपूस केली. या संस्थेला भूखंड मिळवून देणारच, अशी ग्वाही यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संस्थेचे संचालक संजय ढेंगे यांना दिली.


विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली अंध मुलामुलींची भेट