बातम्या

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

Orange alert today in Konkan and Yellow alert in Marathwada along with Vidarbha


By nisha patil - 4/7/2023 1:24:56 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरीआजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातही जोरदार पाऊस सुरु आहे. देशाची राजधानी दिल्लीतही चांगला पाऊस सुरु आहे मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.मुंबईच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण क्षेत्राच चांगला पाऊस पडत असल्यानं धरणांच्या पाण्यात झपाट्यानं वाढ होत आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट