विशेष बातम्या

मोफत गणवेश देण्याबाबत नुकताच आदेश प्रसिद्ध

Order issued recently regarding provision of free uniforms


By nisha patil - 5/31/2023 5:25:05 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश  देण्याबाबत नुकताच आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला 300 रुपये किमतीचा एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाळेच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच या आदेशात गणवेशाच्या रंगाबाबत शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे स्काऊट गाईड विषयासाठी दिला जाणारा निळ्या रंगाचा गणवेश कोण आणि कधी देणार? याबाबतचा संभ्रम कायम आहे.
'समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक 2023-24 भारत सरकार' यांच्या प्रकल्प मान्यता मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्यात समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजना अंदाजपत्रकात एकूण 37 लाख 38 हजार 131 लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी 224 कोटी 28 लाख 69 हजार एवढ्या निधीस केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली. 
शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या साईजप्रमाणे गणवेश खरेदी करावे, गणवेश शिलाई पक्क्या धाग्याची असावी, शिलाई निघाल्यास, गणवेशाचे कापड फाटल्यास अथवा गणवेश याबाबत कोणतीही तक्रार उपस्थित झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहिल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


मोफत गणवेश देण्याबाबत नुकताच आदेश प्रसिद्ध