बातम्या
कोल्हापूर गगनबावडा मार्गाचे काम १२ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
By nisha patil - 2/13/2025 6:23:13 PM
Share This News:
कोल्हापूर गगनबावडा मार्गाचे काम गेले दीड वर्षा पासुन सुरू आहे. याची दखल घेऊन बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी या मार्गावर दोनवडेतील रस्त्याच्या व बालिंगेतील पुलाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना १२ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आलाय. त्यांनी संबंधित ठेकेदाराला तर पुलाचे व रस्त्याचे काम लवकरात लवकर करा, अशा सूचना दिल्या.
यावेळी दोनवडे सरपंच सर्जेराव शिंदे, उपसरपंच संजय कदम, बालिंगे सरपंच राखी भवड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पोवार, दोनवडे, बालिंगे गावचे ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कोतवाल व नागरिक उपस्थित होते.
कोल्हापूर गगनबावडा मार्गाचे काम १२ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
|