कबनूर नळ योजनेच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे आदेश

Order to take action on Kabanur tap scheme proposal


By nisha patil - 6/23/2023 11:38:51 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  कबनूर येथील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेच्या पुरवणी प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करावी, असा आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद पाटील, माजी उपसरपंच सुधीर पाटील व प्रवीण जाधव यांनी दिली. 

कबनूरला जलजीवन मिशन अंतर्गत २९ कोटींची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. योजनेचे काम सुरू आहे. दरम्यान योजनेमध्ये नळ कनेक्शन जोडून देणे, सोलर प्रकल्प उभारणे, पाईपलाईनसाठी खोदाई केलेले रस्ते पूर्ववत करणे, आवश्यक तेथे वाढीव पाईपलाईन टाकणे आदींचा समावेश करण्यासाठी कबनूर ग्रामपंचायत व जलजीवन समितीने पुरवणी प्रस्ताव केला. पुरवणी प्रस्तावास तत्काळ मंजुरी मिळावी यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे ग्रामपंचायत व जलजीवन समितीने सातत्याने पाठपुरावा केला.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेत. त्यामुळे पुरवणी प्रस्ताव मंजुरीचा प्रश्न मार्गी लागला आहे, अशी माहिती दिली. पंचायत समिती माजी सदस्य प्रमोद पाटील, माजी उपसरपंच सुधीर पाटील व ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव आदी उपस्थित होते


कबनूर नळ योजनेच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे आदेश