बातम्या
शाहू महाराज स्मृती कृतज्ञता पर्वामध्ये रंग कला संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन
By nisha patil -
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञ पर्व अंतर्गत कार्यक्रमांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने रंग कला संस्कृती या कार्यक्रमाचे अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल मध्ये विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागातील अधिविभगाच्या विद्यर्थ्यनी विद्यार्थ्यांनी रंग कला संस्कृतीचे बहारदार सादरीकरण केले .यावेळी रुद्र कुलकर्णी यांनी राग गुर्जरी तोडी, धनाजी पाटील यांनी एकल तबला वादन सादर केले तर प्रीतीसुरी दुधारी ,निर्गुणाचा संग, हे शाम सुंदरा ,बोलावा विठ्ठल, अंदाज आरशाचा ,मधुकर वनवन फिरत करी गाणी सादर केली .या कार्यक्रमाप्रसंगी संगीत नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अंजली निगवेकर ,हार्मोनियमवर सौ .गौरी कुलकर्णी ,डॉक्टर सचिन कसोटे ,तबला सौरभ सनदी ,कर्मचारी, विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
शाहू महाराज स्मृती कृतज्ञता पर्वामध्ये रंग कला संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन
|