बातम्या
कोल्हापुर डाक विभागामार्फत डाक चौपाळ उपक्रमाचे आयोजन
By nisha patil - 7/18/2024 6:28:16 PM
Share This News:
ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, तसेच जनतेला आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा व ग्रामीण भागातील आर्थिक समावेशान योजनेमध्ये समाविष्ट करावे या हेतुने गोवा क्षेत्रिय कार्यालयाच्या सुचनेनुसार “डाक चौपाळ” उपक्रमाचे आयोजन, डाक विभाग कोल्हापुर यांनी केले आहे. डाक सर्वेक्षनानुसार 18 गावांची निवड ही डाक चौपाळ या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे प्रवर डाक अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे.
डाक चौपाळ उपक्रमात खालील बाबींचा समावेश असणार आहे:-
पोस्ट ऑफिस सेविंग बँक, आवर्ती योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट आयपीपीबी खाते, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना व जीवन सुरक्षायोजना, अटल पेन्शन योजना पोस्टाच्या या योजना गावातील प्रत्येक घरात पोहचविणे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षारता निर्माण करणे. केंद्र व राज्य सरकार मार्फ़त डिजिटल पेमेंट बेनिफिट जसे की कुकिंग गॅस सबसिडी, लाडकी बहिण योजना, प्रधानमंत्री किसान योजना या करीता लागणारी, ग्राहकाच्या सेविंग खात्या सोबत आधार नंबरची जोड़नी करने. नवीन बाल आधार रजिस्ट्रेशन करने , जुने आधार अपडेट करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण टपाल जीवन विमा,अपघाती विमा व IPPB सेवा प्रदान करणे.
गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती, मातृवंदना, प्रधानमंत्री किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, पैसे पाठविण्यासाठी IMPS, NEFT, RTGS सुविधा असे आर्थिक लाभ थेट प्रत्येक कुटुंबाला, नागरिकाला, विद्यार्थ्यांना मिळावेत, तसेच पोस्टाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार व्हावेत, आर्थिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी “डाक चौपाळ” कार्यक्रम या 18 गावामध्ये राबविला जात आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील पात्र महिलांचे POSB/ POSB Basic saving सुविधेमार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे डीबीटी अकांऊट काढण्यासाठी जिल्ह्यातील 96 पोस्ट ऑफिसच्या कार्यक्षेत्रात येणा-या अंगणवाडी स्तरावर, तसेच जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याशी समन्वय साधून व माजी आमदार अमल महाडिक व राजेश क्षीरसागर (कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ) यांच्या कडून आलेल्या पत्रानुसार, त्यांनी पत्रात जोडलेल्या संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून डीबीटी अकांऊट काढण्यासाठी,फिजिकल मॅनडेट फॉर्म भरुन घेवून 40 ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन केले आहे व या लोककल्याणकारी योजनेचा लाभ,संबधितांना मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
कोल्हापुर डाक विभागामार्फत डाक चौपाळ उपक्रमाचे आयोजन
|