शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Organization of Shivspandan annual sports festival in Shivaji University


By nisha patil - 3/3/2025 3:41:41 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण अधि विभागाच्या वतीने शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन दिनांक 3 मार्च ते 7 मार्च पर्यंत करण्यात आले आहे. या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर. डी. टी शिर्के यांच्या हस्ते सायंकाळी 4.30 वाजता क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल येथे होणार आहे. 

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय प्राध्यापक डॉ. पी. एस .पाटील, माननीय डॉ.व्हि. एन.शिंदे, माननीय डॉ. ए.एन.जाधव, माननीय श्रीमती. एस .एस पाटील, माननीय डॉ. एस .एच. ठकार, मा. प्रा. एम.एस.देशमुख, मा. प्रा. डॉ. एस. एस.महाजन, या क्रीडा महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण व संयोजन समितीचे प्रा. डॉ. एस. व्ही.बनसोडे यांनी केले आहे.


शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन
Total Views: 39