बातम्या

जागतिक पुस्तक दिनाचे आयोजन

Organization of World Book Day


By nisha patil - 4/23/2024 9:13:04 AM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी युनेस्को तर्फे दरवर्षी जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिनाचे आयोजन केले जाते.  जागतिक स्तरावर वाचन आणि लेखनाचे महत्त्व वाढविणे हा या दिवसाचा उद्देश आहे. जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन साजरा करण्यामागचा उद्देश पुस्तक वाचनाचा आनंद लोकां पर्यंत पोहोचविणे हा आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यंदाची थीम निवडण्यात आली आहे. त्यानुसार Read your way ही 2024 साठी ची थीम आहे. याचा अर्थ ' तुमचा मार्ग वाचा'असा होतो. 
 

 इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज् नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देऊन त्यासाठी काम करत असतो. वाचन या कृतीचे समर्थन करण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज् ने पुढाकार घेतला आहे. 
 

आम्ही वाचतो तुम्हीही वाचा..... या अंतर्गत क्लब पुढील वर्षभर उपक्रम राबवणार आहे.Club ISO नंदिनी पाटील यांनी या कामात पुढाकार घेतला आहे. Club president मनिषा जाधव Club Secretary स्मिता खामकर... यांनी या कामात मार्गदर्शन केले. 
 

क्लब मेंबर्स अपर्णा पाटील, राखी भांबुरे, शमीम शेख, पुनम सरनाईक, सपना नकाते, प्रियामेज, शिल्पा कुलकर्णी यांनी भरीव सहभाग नोंदवला.युनेस्को तर्फे जागतिक पुस्तक दिनाचे आयोजन करण्यात येते. यात विविध वाचकांनी उस्पुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. यामुळे निश्चितच याचा वाचनसंस्कुती साठी फायदेशीर ठरेल असे आयोजकांनी सांगितले.


जागतिक पुस्तक दिनाचे आयोजन