शैक्षणिक
शहाजी'मध्ये जिल्हास्तरीय पदवीस्तर अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
By nisha patil - 6/2/2025 12:54:41 PM
Share This News:
शहाजी'मध्ये जिल्हास्तरीय पदवीस्तर अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मशताब्दी निमित्त आणि कै. श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय पदवी स्तर अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या वक्तृत्व स्पर्धा 7 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयात होणार आहेत, तरी स्पधर्कांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. डी. के. वळवी यांनी केले आहे.
वक्तृत्व स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे श्रीपतराव बोंद्रे दादा व्यक्ति व जीवन कार्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज द्रष्टा राजा, स्त्री पुरुष समानता वास्तव की कल्पना, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक अवलिया समाज सुधारक , कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक, समाज माध्यमांच्या विळख्यात गुरफटलेली तरुणाई. स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे .अधिक माहितीसाठी 94 20 13 51 70 या क्रमांकावर संपर्क साधावा.
शहाजी'मध्ये जिल्हास्तरीय पदवीस्तर अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
|