बातम्या

कोल्हापूर मध्ये 25 जानेवारीला कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

Organization of loan information and guidance meeting on January 25 in Kolhapur


By neeta - 1/24/2024 3:09:53 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळावा कोल्हापूर दि. 25 जानेवारी  रोजी सकाळी 9.30 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

 

            या मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व संपूर्ण माहिती घेऊन योजनांचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजकासह उपस्थित राहणार आहेत. जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, दुग्धविकास विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) कोल्हापूर व आरसेटी कोल्हापूर इत्यादी विभाग असणार आहेत.


कोल्हापूर मध्ये 25 जानेवारीला कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन