बातम्या
महाराष्ट्रातील GBS साथीच्या आजाराच्या संदर्भात बैठकीचे आयोजन
By nisha patil - 4/2/2025 4:25:41 PM
Share This News:
महाराष्ट्रातील GBS साथीच्या आजाराच्या संदर्भात बैठकीचे आयोजन
कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्यातील GBS साथीच्या आजाराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार जे.पी. नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीव्दारे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डाजी यांनी GBS साथीच्या आजाराचा सर्वंकष आढावा घेतला आणि महाराष्ट्र सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ, पाणीपुरावठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीचे आयोजन कोल्हापूर भाजपाचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट चंद्रकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
महाराष्ट्रातील GBS साथीच्या आजाराच्या संदर्भात बैठकीचे आयोजन
|