बातम्या

रायगडमध्ये आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेणेसाठी बैठकीचे आयोजन

Organization of meeting to review health matters in Raigad


By nisha patil - 1/29/2025 12:39:52 PM
Share This News:



रायगडमध्ये आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेणेसाठी बैठकीचे आयोजन

मार्च महिन्याअगोदर डॉक्टरांची नवीन भरती प्रकिया करण्याचे निर्देश

रायगड येथे आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेणेसाठी ना. प्रकाश आबिटकर रोजगार हमी मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.  

रायगड येथे आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेणेसाठी ना. प्रकाश आबिटकर रोजगार हमी मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश आबिटकरांनी दिले. आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रतीक्षा यादीत असलेल्या MBBS उमेदवाराना तातडीने नियुक्ती देवून, मार्च महिन्याअगोदर डॉक्टरांची नवीन भरती प्रकिया करण्याचे निर्देश दिले. रुग्णालयात गैरहजर असलेल्या बंधपात्रित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

रायगड जिल्ह्यातील वाढते औद्योगीकीकरण व मुंबई-गोवा महामार्गवरील अपघात यामुळे ट्रॉमा केअर सेंटर, दोन डायलेसिससेंटर वाढवण्याची तसेच डॉक्टरांची रिक्त जागा भरण्याची मागणी केली. या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आबिटकरांनी दिल्या. या बैठकीला आरोग्य सचिव डॉ.निपुण विनायक, सचिव वीरेंद्रसिंह, आयुक्त अमगोथू श्री.रंगा नायक, संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


रायगडमध्ये आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेणेसाठी बैठकीचे आयोजन
Total Views: 41