बातम्या
राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धेचे के.आय.टी मध्ये आयोजन
By nisha patil - 2/20/2025 12:19:46 PM
Share This News:
राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धेचे के.आय.टी मध्ये आयोजन
देशभरातून सुमारे तीन हजार तीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग...
के.आय.टी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने पायोनियर ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धचे गेली सत्तावीस वर्षे यशस्वीपणे आयोजित केली जातेय. यावर्षी 22, 23 फेब्रुवारी 25 रोजी 28 वे पायोनियर के आय टी कॉलेजच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
दिल्ली,बिहार,कर्नाटक,गोवा तसेच अन्य वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या इंजिनिअर डिप्लोमा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. देशभरातून तंत्रज्ञान सुमारे तीन हजार तीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. के आय टी कॉलेजचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये तांत्रिक कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे असं असल्यास त्यांनी सांगितले. यावर्षी होणाऱ्या 28 व्या पायोनियर 25 चे उद्घाटन काग्निजंट पुणे या कंपनीच्या वरिष्ठ एचआर शिल्पा महाजनी यांच्या हस्ते होणार असून त्यांच्यासोबत कॉग्निजंटचे कौस्तुभ ठाणावाला व मुस्कान चितलांजिया हे दोघेही अधिकारी सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धेचे के.आय.टी मध्ये आयोजन
|