बातम्या
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे शनिवारी आयोजन
By nisha patil - 3/1/2025 1:02:24 PM
Share This News:
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे शनिवारी आयोजन
जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या सर्व दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या सर्व दिव्यांग शाळांमधील 325 दिव्यांग विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये दिव्यांगासाठी धावणे, लांबउडी, गोळाफेक, सॉफ्टबॉल थ्रो, सॉफ्टबॉल जंप, बुध्दीबळ, पासिंग द बॉल, पोहणे इत्यादी क्रिडा प्रकारांचा समावेश असणार आहे.
या क्रिडा स्पर्धेचे संपूर्ण नियोजन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांनी केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे शनिवारी आयोजन
|