बातम्या

शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करा

Organize various activities under Education WeekOrganize various activities under Education Week


By nisha patil - 7/25/2024 7:20:43 PM
Share This News:



 राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ) मीना शेंडकर यांनी केले आहे.

शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागकारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.

शिक्षण सप्ताहाचे उपक्रम पुढीलप्रमाणे दिनांक 26 जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, दिनांक 27 जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम/शालेय पोषण दिवस व दिनांक 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व योजना या तीनही विभागांच्या समन्वयातून शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. आजअखेर अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस सर्व शाळांमध्ये उत्साहात संपन्न करण्यात आले असून पुढील तीन दिवसांमध्ये कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, इको क्लब उपक्रम/ शालेय पोषण दिवस व समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती उद्भवलेल्या ठिकाणी शाळा बंद ठेवणेच्या सूचना असल्या तरी इतर सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाची कार्यवाही सुरु आहे. शिक्षण सप्ताह अंतर्गत राबविण्यात येणा-या उपक्रमांची छायाचित्रे, माहिती http://shikshasaptah.com/shiksha-saptah  या लिकवर अपलोड करावे.


शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करा