बातम्या

भारतीय मजदूर संघ, कोल्हापूर यांचेवतीने G-20 अंतर्गत L-20 परिसंवाद आयोजन

Organized L20 Seminar under G20 by Bharatiya


By nisha patil - 6/21/2023 11:35:14 AM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  भारतीय मजदूर संघाच्या चालीरिती प्रमाणे सदर परी समाजाची सुरुवात झाली.
श्री. अमृत लोहार जिल्हा कोषाध्यक्ष ह्यांनी श्रमिक गीत म्हणून व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अँड. सौ. अनुजा धरणगांवकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा ह्यांनी उपस्थित मान्यवर पदाधिकारी इतर संघटना प्रतिनिधी तसेच उद्योगपती ह्याचा परिचय व स्वागत पुष्पगुच्छ देऊन केला.  ॲड. अनिल ढुमणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्यांनी L-20 विषयी सविस्तर विवेचन केले G-20 सदस्य देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर भारतातील क्रमांक एकची संघटना असल्याने L-20 (लेबर-20) चे अध्यक्षपद भारतीय मजदूर संघाला मिळाले.  आप G-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी कामगार प्रतिनिधी व भारतातील सर्व संघटनांचे कामगार प्रतिनिधी तसेच तसेच उदयोजक ह्यांच्याशी विचारविनिमय चर्चा करून कामगाराविषयी एक वैश्विक धोरण ठरविण्याचा प्रयत्न L-20 अंतर्गत भारतीय मजदूर संघ करत आहे.
उदयोजक - श्री. जयवंतराव कुलकर्णी प्रतिनिधी घाटगे -पाटील इंडस्ट्रीज कोल्हापूर . श्री.धोत्रे साहेब अध्यक्ष, पंचतारांकित उदयोजक संघटना यांनी L-20 हा उपक्रम स्तुत्य असून सर्वानी एकम येवून धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
असंघटित कामगार व माथाडी कामगार नेते श्री. मकरंद देसाई यांनी 2020 ला पाठिंबा दर्शविला.
मा. सहाय्यक कामगार आयुक्त श्री. विशाल घोडके साहेब यांनी L-20 सारख्या विषयांवर सरकारच्या पातळीवर आवश्यक सगळी मदत करायला तयार असल्याचे प्रतिपादन केले. सर्व सरकारी योजनांची माहिती समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत  पोहोचविणे आवश्यक आहे असे नमूद केले. श्री. मोहन येनूरे महामंत्री महाराष्ट्र प्रदेश यांनी समारोपांत सर्वांना L.20 अंतर्गत जनजागृती करून आपण कामगारांसाठी एक यशस्वी धोरण   ठरविण्यासाठी सहभाग घेण्याबाबत आवाहन केले. श्री. प्रविण जाधव जिल्हा चिटणीस यांनी आभार  मानले. ॲड. सौ. मधुरा कुलकर्णी यांनी पसायदान
गायले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. एस. एन.पाटील, श्री.जयंतराव देशपांडे, श्री. रमेश थोरात, श्री. विष्णू जोशीलकर, श्री बापू दडस, श्री.  संदिप पाटील सौ. ज्योती तावरे इ. भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते सौ. सुरेखा राजेशिर्के यांनी सूत्रसंचालन केले. परिसंवादास साधारणपणे २०० पेक्षा जास्त पुरुष, महिला कामगार वर्ग,  उद्योगपती तसेच इतर संघटना प्रतिनिधी हजर होते.


भारतीय मजदूर संघ, कोल्हापूर यांचेवतीने G-20 अंतर्गत L-20 परिसंवाद आयोजन