बातम्या

रेंदाळ येथे लाडकी बहीण योजना व चर्चासत्राचे आयोजन...

Organized Ladaki Bahin Yojana and seminar at Rendal


By nisha patil - 8/14/2024 4:15:42 PM
Share This News:



रेंदाळ येथे लाडकी बहीण योजना व चर्चासत्राचे आयोजन...

माजी जिल्हा परिषद सदस्य शौमीका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र संपन्न

रेंदाळ ता हातकणंगले येथे भारतीय जनता पार्टी रेंदाळ शहर व महायुती चे सर्व मित्र पक्ष यांच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबीर व लाडकी बहीण योजना चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते,,,,, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका अमल महाडिक वहिनी यांच्या अध्यक्षतेखाली व  हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले,,, यावेळी गोकुळ चे संचालक मुरलीधर जाधव,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष अविनाश बनगे, माजी जि प सदस्य विलास खानविलकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा पुष्पाताई पाटील,कार्यक्रमाचे आयोजक व जिल्हा उपाध्यक्षा पार्वती निकम वहिनी,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ नीता माने,माजी लोकनियुक्त सरपंच विजय माळी,मोहन भंडारे,माजी सरपंच नारायण भोसले,शिवसेना शहरप्रमुख शरद पाटील,ताराराणी शहर प्रमुख संदीप करडे,आर पी आय अध्यक्ष भगवान कांबळे,मनसे अध्यक्ष अभिजित घोडेस्वार,आय सी डी एस सुपरवायझर माने मॅडम,मस्के मॅडम,अभिषेक पाटील यांसह महिला भगिनी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते!


रेंदाळ येथे लाडकी बहीण योजना व चर्चासत्राचे आयोजन...