बातम्या

पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे 25 जानेवारी रोजी आयोजन

Organized Pandit Deendayal Upadhyay Divisional Employment Fair on 25th January


By neeta - 1/24/2024 1:40:44 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे आणि   श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 25 जानेवारी 2024 रोजी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर कॅम्पस (तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय ) वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन    कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

             या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 27 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे 2 हजार 500 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्यासाठी कळविण्यात आली आहेत.  या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, ‍अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

           इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त अ. उ. पवार यांनी दिली आहे.


पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे 25 जानेवारी रोजी आयोजन