बातम्या
युवासेना व नो मर्सी ग्रुप वतीने "राजेश युथ फेस्टीव्हल" चे आयोजन
By nisha patil - 3/8/2024 9:01:08 PM
Share This News:
युवासेना व नो मर्सी ग्रुप वतीने "राजेश युथ फेस्टीव्हल" चे आयोजन
युवा वर्गास स्पर्धात्मक क्रीडा प्रकारासह वैयक्तिक कला-गुणांना वाव देण्याची संधी
कोल्हापूर दि.०३ : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो, भारतातही युवा वर्गाकडून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून, अखंड मित्रत्वाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करते. या मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने “राजेश युथ फेस्टिव्हल” चे येत्या रविवार दि. ०४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत “मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर” येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कलाकृती चित्रकला स्पर्धा, सौंदर्य स्पर्धेसह डीजे पार्टी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासह विशेषतः उपस्थित युवा वर्गास निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पुष्कराज क्षीरसागर म्हणाले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री.ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गेली १२ वर्षे फ्रेन्डशिप डे निमित्त मैत्री युवा महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाची भव्यता वाढविण्यात आली असून महाविद्यालयीन युवा वर्गास शिक्षणासोबतच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची संधी राजेश युथ फेस्टीव्हलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या फेस्टिव्हल अंतर्गत दि.४ ऑगस्ट या मैत्री दिनी मेरी वेदर ग्राउंड येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या फेस्टीव्हल अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ दि.४ रोजी मेरी वेदर मैदान येथे सायंकाळी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता फेस्टीव्हलची सुरवात होणार आहे. यावेळी युवा वर्गा साठी डीजे पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता मेरी वेदर मैदान येथे भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला आहे. राजेश युथ फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांत युवा वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी केले आहे.
आर.वाय.एफ.फुटबॉल स्पर्धेवर बी.एल.बॉईज ची मोहर
राजेश युथ फेस्टीव्हल अंतर्गत टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि.१ व २ ऑगस्ट दरम्यान टिकी- टाका टर्फ ग्राउंड, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे या स्पर्धा पडल्या. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील ३२ फुटबॉल संघांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात आली. या स्पर्धेत बी.एल.बॉईज आणि डी गँग या दोन संघांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्याचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. ट्राय ब्रेकर पर्यंत अटातटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात बी.एल.बॉईज संघाने डी गँग संघावर मात करत आर.वाय.एफ. फुटबॉल स्पर्धेवर आपली मोहर उमटवली. या स्पर्धेतील विजेत्या बी.एल. बॉईज संघास रोख रु.२५ हजार व चषक बक्षीस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या डी ट्राय ब्रेकर संघास रोख रु.१५ हजार व उपविजेता चषक, तृतीय संघास रोख रु.५ हजार व चषक यासह प्लेअर ऑफ द टूर्नामेंट रु.५ हजार आणि टॉप स्कोरर ऑफ द टूर्नामेंट अशी प्रत्येकी रु.२५०० इतके वैयक्तिक बक्षीस देण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना, युवासेना व नो मर्सी गुपचे पदाधिकारी व फुटबॉल प्रेमी उपस्थित होते. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू कैलास पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी संयोजन कपिल सरनाईक, , रोहित मंडलिक, श्रीकांत पिंपळे, समर घोरपडे, रितेश पवार, आयुष पाटील, जय पाटील, आयुष चौगले, मयूर चौगले, सोमनाथ माने, अभिजित पाटील, विनायक मंडलिक आदींनी केले.
युवासेना व नो मर्सी ग्रुप वतीने "राजेश युथ फेस्टीव्हल" चे आयोजन
|