बातम्या
यशस्वी मंचतर्फे "संक्रांत सोहळा 2025" चे आयोजन
By nisha patil - 12/23/2024 3:31:21 PM
Share This News:
यशस्वी मंचतर्फे "संक्रांत सोहळा 2025" चे आयोजन
कोल्हापूर, ताराबाई पार्क येथील मांगल्य लॉनमध्ये 18 जानेवारी रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 8 या वेळेत यशस्वी मंचतर्फे "संक्रांत सोहळा 2025" चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात महिलांसाठी आणि मुलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, हळदीकुंकू कार्यक्रमासह फॅशन शो, डान्स स्पर्धा, स्टॉल्स, आणि लकी ड्रॉ यांचा आनंद सहभागी होणाऱ्यांना लुटता येणार आहे.
.%5B3%5D.jpg)
स्पर्धांमध्ये फॅशन शो आणि डान्स स्पर्धा या प्रमुख आकर्षण असून, विविध वयोगटांसाठी त्या खुल्या आहेत. विजेत्यांना Rangson Art कडून सुंदर क्राऊन, मोहीनी पैठणी, तसेच वनकुंद्रे ब्रदर्स अँड कंपनी कडून आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी आहे.
स्पर्धांचे वयोगट:
फॅशन शो: ५ ते १० वर्षे, ११ ते १६ वर्षे, १७ वर्षे व पुढे.
डान्स स्पर्धा: सोलो (५ ते १०, ११ ते १६, १७ वर्षे व पुढे) आणि ग्रुप (वयाची अट नाही).
कार्यक्रमासाठी नाव नोंदणी सुरू असून, अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक +91 80071 00166 किंवा +91 98904 50471 वर संपर्क साधता येईल.
कोल्हापूरवासीयांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संक्रांत सोहळ्याचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यशस्वी मंचतर्फे "संक्रांत सोहळा 2025" चे आयोजन
|