बातम्या

विवेकानंद मध्ये " टेक्नो स्पार्क " कार्यक्रमाचे आयोजन

Organized Techno Spark event in Vivekananda


By nisha patil - 2/3/2024 7:41:16 PM
Share This News:



विवेकानंद मध्ये  " टेक्नो स्पार्क " कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर दि. 02 :   येथील विवेकानंद कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून बी. एस्सी.  कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) विभागाच्या वतीने दिनांक ०१/०३/२०२४ ते ०२/०३/२०२४ या दिवशी टेक्नो स्पार्क या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयातील गणित विभागप्रमुख प्रा. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

           

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विभागातर्फे कोडींग स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा व पोस्टर प्रेझेन्टेशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमास परीक्षक म्हणून  प्रा. प्रशांत तांदळे, भारती विद्यापीठ कोल्हापूर , प्रा. गीतांजली साळुंखे, प्रा. शिल्पा भोसले विवेकानंद ज्युनिअर कॉलेज यांनी काम पहिले.  प्रा. पल्लवी देसाई, विभागप्रमुख, बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) यांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

           

सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व  प्रा. पल्लवी देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


विवेकानंद मध्ये " टेक्नो स्पार्क " कार्यक्रमाचे आयोजन