बातम्या
'विकसित भारत संकल्प यात्रा' कार्यक्रमाचे आयोजन
By nisha patil - 12/12/2023 11:07:49 PM
Share This News:
'विकसित भारत संकल्प यात्रा' कार्यक्रमाचे आयोजन
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने 'विकसित भारत संकल्प यात्रा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कोल्हापूर शहरात हा कार्यक्रम दि. १९ डिसेंबर २०२३ या पर्यंत विविध ठिकाणी राबविला जात आहे. कार्यक्रमामध्ये केंद्र शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जसे प्रधानमंत्री आवास योजना, पी. एम स्वनिधी, स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत अशा विविध योजनांची माहिती देवून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिका मार्फत करण्यात आले आहे.
'विकसित भारत संकल्प यात्रा'कार्यक्रम पुढीलप्रमाणे - दि. १२ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात आर. के. नगर - राजेंद्र नगर (एस. एस. सी बोर्ड चौक) व दुपार सत्रात गांधीनगर - टेंबलाईवाडी चौक, दि. १३ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात शहर मध्यवर्ती बस स्थानक समोर व दुपार सत्रात सायबर चौक, दि. १४ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात सोन्या मारुती चौक - शेळके उद्यान मागे व दुपार सत्रात गंगावेश - मुख्य चौक,दि. १५ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात रंकाळा तलाव - वाशी नाका व दुपार सत्रात सदर बाजार - शाहू कॉलेज समोर, दि. १६ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात सासने ग्राऊंड व दुपार सत्रात शाहू मार्केट यार्ड - बापट कॅम्प रोड, दि. १७ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात फुलेवाडी - प्राथमिक आरोग्य केंद्र व दुपार सत्रात उभा मारुती चौक, दि. १८ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात महावीर गार्डन - नागाळा पार्क - वाइल्डर मेमोरियल चर्च समोर व दुपार सत्रात रमण मळा चौक व दि. १९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळ सत्रात हुतात्मा पार्क चौक - झाकीर हुसेन शाळा येथे व दुपार सत्रात उद्यम नगर - SBI चौक येथे होणार आहेत.
'विकसित भारत संकल्प यात्रा' कार्यक्रमाचे आयोजन
|