शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात श्याम बेनेगलांच्या चित्रपटावर सेमिनारचे आयोजन
By nisha patil - 6/2/2025 7:21:59 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने ७ व ८ फेब्रुवारीला 'दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा' या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय सेमिनारचे आयोजन सकाळी अकरा वाजता करण्यात आलय.
सेमिनारचे उद्घाटन व मार्गदर्शन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के करणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रमोद पाटील याची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सेमिनारचे बीजभाषण ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक व लेखक डॉ. चंद्रकांत लंगरे करणार आहेत. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. विश्राम ढोले आहेत. या कार्यशाळेत डॉ. राजेंद्र गोणारकर ,डॉ. प्रसाद ठाकूर ,डॉ. विशाखा गारखेडकर, सरफराज मुल्ला, डॉ. अंजली निगवेकर मार्गदर्शन करणार आहेत.
शिवाजी विद्यापीठात श्याम बेनेगलांच्या चित्रपटावर सेमिनारचे आयोजन
|