विशेष बातम्या

किरण माळी युवा मंचच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन

Organized blood donation camp on behalf of Kiran Mali Yuva Manch


By nisha patil - 2/6/2023 3:58:15 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  हातकंणगले येथील कुंभोज तालुक्यातील महाविकास आघाडीचे गट नेते किरण माळी यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं  आहे.वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा देऊन कोल्हापूर येथील वैभवी लक्ष्मी ब्लड बँकेच्या माध्यमातून सीमेवरती देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना व कोरणा कालावधीत आवश्यक असणाऱ्या नागरिकांना रक्ताचा पुरवठा होण्यासाठी किरण माळी युवा मंचच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन हनुमान मंदिर कुंभोज येथे करण्यात आल. .रक्तदान शिबिराचे उद्घाटन कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री जाधव, उपसरपंच अनिकेत चौगुले  यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जवळजवळ 151 रक्तदात्यांनी रक्तदान केले
     यावेळी आमदार राजू बाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच किरण नामे, उपसरपंच धनाजी तिवढे, ऋतुराज तोरस्कार, कॉन्ट्रॅक्टर नितीन भागवत, किरण माळी लाटवडे, शितल हेरले वठार, अक्षय चव्हाण सावर्डे, अभिजीत जाधव, एडवोकेट अमित साजनकर, विक्रम सिंह तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ, सूर्योदय  युवा संघटना तसेच गावातील विविध राजकीय सामाजिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून किरण माळी यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी बाहुबली येथील साधकाश्रमात फळे वाटप करण्यात आली.


किरण माळी युवा मंचच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन