खेळ
इचलकरंजीत जयहिंद मंडळच्या वतीने भव्य मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन
By nisha patil -
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयहिंद मंडळ यांच्या वतीने कोल्हापूर व सांगली जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने भव्य मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा या 70 किलो वजनी गटातील असून सदर स्पर्धेमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 18 नामवंत संघाना निमंत्रित करण्यात आले आहेत. दिनांक 14 ते 16 मे रोजी प्रकाशझोतामध्ये सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत या स्पर्धा जयहिंद मंडळ येथे आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण 30 सामने होणार आहेत. एकूण 300 स्पर्धक व पंच या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने असे हे सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्तरावरील खेळाडू आपल्या खेळाचे कौशल्य दाखवणार असून स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिके व ट्रॉफी दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येक दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट पकड त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट पकड, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत आहे. सदर स्पर्धेतील बक्षिसे इचलकरंजी शहरातील जुने नामवंत कबड्डी पट्टूंच्या नावे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कै.मल्हारपंत बावचकर यांच्या स्मरणार्थ तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कै.गजाननराव कांबळे तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस कै. सदाशिवराव सुलतानपूरे यांच्या स्मरणार्थ दिले जाणार आहे. वैयक्तिक बक्षिसे ही कै.किरण होगाडे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व कै. हिंदुराव कौंदाडे राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिली जाणार आहेत. क्रीडा शौकिनांना या सामन्यांचा आनद लुटता यावा यासाठी प्रेक्षा गॅलरी ची व्यवस्था करणेत आली आहे. स्पर्धा यशस्वी करणेकरिता स्पर्धेची जय्यत तयारी करणेत आली आहे. तरी सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी समितीचे कार्याध्यक्ष राहुल खंजिरे यांनी केले आहे.
इचलकरंजीत जयहिंद मंडळच्या वतीने भव्य मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन
|