बातम्या

विवेकानंद कॉलेजच्या आयोजित ‘पूल कॅम्पस ड्राइव’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Organized by Vivekananda College  Spontaneous response of students to Pool Campus Drive


By nisha patil - 5/16/2024 12:09:01 PM
Share This News:



श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या भौतिकशास्त्र विभागाकडून ११ मे रोजी ‘पूल कॅम्पस ड्राइव’ चे आयोजन करण्यात आले होते. पुणे आणि कोल्हापूर भागातील नामांकित असलेल्या Hicool, Finolex cables Ltd, Flash Elecronics Ltd, Enzene Bioscience Ltd, Saarloha, Eaton, Emcure, Sukrut info tech. या कंपनीकडून मुलाखती पार पडल्या. एकूण १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यातील १४७ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात झाली.

या निमित्ताने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखेसंस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडेमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर आर कुंभार व डॉ. श्रुती जोशी यांचे सहकार्य मिळाले. या ‘पूल कॅम्पस ड्राइव’ चे यशस्वी नियोजन विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील डॉ. गणेश नवातेडॉ. सुमय्या इनामदार , प्रा. अभिजित शिंदेडॉ. नम्रता नरेवाडीकरडॉ. सरिता कुंभारप्रा. उमेश बोधगिरेप्रा. अनुरथ गोरेप्रा. शिवानी पाटीलप्रा. सायली गावडेप्रा. गौरी जाधव यांनी परिश्रम घेतले.


विवेकानंद कॉलेजच्या आयोजित ‘पूल कॅम्पस ड्राइव’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद