खेळ
जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन
By nisha patil - 5/2/2025 7:21:35 PM
Share This News:
जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर, दि. 5 फेब्रुवारी 2025: जिल्हा परिषद कोल्हापूरने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ केला. 5 फेब्रुवारी 2025 रोजी वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे बुध्दीबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत नियमित महिला, पुरुष कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या बुध्दीबळ स्पर्धा पार पडल्या. नियमित कर्मचारी वर्गासाठी 18 ते 35, 36 ते 45, आणि 46 ते 60 वयोगटानुसार स्पर्धा घेण्यात आल्या, तर कंत्राटी कर्मचारी वर्गासाठी खुला गट आयोजित करण्यात आला.
पुरुष वयोगटातील विजेते:
- 18 ते 35 वयोगट: असिफ सय्यद (प्रथम), वैभद गुटटे (द्वितीय), चिंतामणी कारजगे (तृतीय)
- 36 ते 45 वयोगट: सचिन माने (प्रथम), विनायक सुतार (द्वितीय), मुरलीधर कुंभार (तृतीय)
- 46 ते 60 वयोगट: सुभाष भोसले (प्रथम), प्रशांत गायकवाड (द्वितीय), सुनिल व्हटकर (तृतीय)
महिला वयोगटातील विजेते:
- 18 ते 35 वयोगट: समिक्षा पाटील (प्रथम), तेजस्विनी टिपुगडे (द्वितीय), दिक्षा ओहळा (तृतीय)
- 36 ते 45 वयोगट: सुप्रिया घोरपडे (प्रथम), राजश्री काकतकर (द्वितीय), मनिषा कांबळे (तृतीय)
- 46 ते 60 वयोगट: मनिषा देसाई (प्रथम), शुभांगी कार्वेकर (द्वितीय), अर्चना खाडे (तृतीय)
कंत्राटी कर्मचारी विजेते:
- पुरुष गट: राहूल जावडे (प्रथम), शरद जाधव (द्वितीय), गजानन कुलकर्णी (तृतीय)
- महिला गट: सायली पाटील (प्रथम), संमृध्दी पाटील (द्वितीय), कविता माळी (तृतीय)
आंतरराष्ट्रीय पंच श्री भरत चौगुले आणि राष्ट्रीय पंच मनिष मारुलकर व आरती मोदी यांनी स्पर्धेचे मूल्यांकन केले. बुध्दीबळ स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन प्रसाद बोरकर, प्रज्योत कुंभार, सुशांत सूर्यवंशी, स्वप्नीaल पाटील, आदित्य पोवार व सागर जाधव यांनी केले.
योजना: या क्रीडा स्पर्धांचे पुढील आयोजन 10 फेब्रुवारी रोजी सायकल रेस व 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान व्हॉलीबॉल पुरुष स्पर्धांसाठी होणार आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन
|