शैक्षणिक

विवेकानंद कॉलेज मध्ये ग्राहक जागरुकता उपक्रमाचे आयोजन

Organized consumer awareness activities in Vivekananda College


By nisha patil - 1/20/2025 3:36:08 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेज  मध्ये  ग्राहक जागरुकता  उपक्रमाचे  आयोजन

 विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा व माहिती अधिकार कायदा या विषयी जागृत करण्यासाठी विवेकानंद कॉलेज मधील वाणिज्य विभाग व उद्योजकता विकास कक्ष यांच्यामार्फत ग्राहक जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते.

 या  उपक्रमामध्ये ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना ती स्वाभिमानाने करावी असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर महानगरचे संघटक सुहास गुरव यांनी केले. विद्यार्थ्यानी ग्राहक संरक्षण कायद्याचा अभ्यास करून आपणास  ग्राहक म्हणून असणारे अधिकार व जबाबदारी यांची माहिती घेऊन वस्तू व सेवा खरेदी कराव्यात असे विचार त्यांनी मांडले. 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर महानगरचे सचिव विनायक वाळवेकर यांनी माहिती अधिकार कायदा या विषयी माहिती दिली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर महानगरचे उप-संघटक  प्रशांत चौगुले यांनी जागृत ग्राहकासाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन करून घेतले.

या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व रजिस्ट्रार .आर.बी.जोग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रास्ताविक  वाणिज्य  विभाग प्रमुख प्रा. सनी काळे यांनी केले  व आभार डॉ. यु. डी. दबडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी साठी डॉ. ए. एल.  मोहिते, डॉ. वाय. बी. माने, डॉ. आर. आर. पाटील, डॉ. एस. एस. आवटे व  विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.


विवेकानंद कॉलेज मध्ये ग्राहक जागरुकता उपक्रमाचे आयोजन
Total Views: 91