शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन
By nisha patil - 2/27/2025 6:10:19 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर दि.27 : विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागात 27 फेब्रुवारी 2025 रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा करण्यासाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता आश्वासन समिती (IQAC) च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
स्पर्धेत महाविद्यालयातील बीएससी भाग 1, 2, आणि 3 च्या विद्यार्थ्यांनी उत्साही व सक्रियपणे सहभाग घेतला. यावर्षीचे वादविवादाचे विषय अत्यंत आकर्षक होते: "आधुनिक तंत्रज्ञान - शाप की वरदान?", "पाळीव प्राणी जतन करणे योग्य की अयोग्य?" आणि "संशोधनात प्राण्यांचा उपयोग करणे योग्य की अयोग्य?" विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची अत्यंत ठाम आणि प्रभावी मांडणी केली, ज्यामुळे स्पर्धा खूपच रोचक व आकर्षक ठरली.
या स्पर्धेत 32 विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. परीक्षक म्हणून डॉ. सलमा मुल्ला यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विचारांना गती दिली. स्पर्धेचे प्रात्यक्षिक डॉ. टी. सी. पाटील यांनी केले, तर कु. नम्रता जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व IQAC च्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी, रजिस्टार आर बी जोग यांचे सहकार्य लाभले. प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. या यशस्वी कार्यक्रमाने, IQAC च्या समन्वयाने व मार्गदर्शनाने स्पर्धेचे आयोजन अधिक प्रभावी आणि प्रेरणादायक बनवले.
विवेकानंद महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन
|