बातम्या

दिव्यांग बांधवांसाठी विशेष साहित्य वाटपाचे आयोजन...

Organized distribution of special materials for disabled brothers


By nisha patil - 4/2/2025 1:52:41 PM
Share This News:



 हॅन्डीकॅप बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण रोजगार उद्योग केंद्र व सिद्धेश्वर दिव्यांग संस्था, लक्ष्मीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी विशेष साहित्य वाटप व केंद्र सरकारच्या कायर बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या काथ्या उद्योग प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम ना. प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

ना. प्रकाश आबिटकर बोलताना म्हणाले की,दिव्यांग बांधवांच्या आत्मनिर्भरतेसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती सक्षम व्हावी, हा कौतुकास्पद उद्देश यामागे आहे.

या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशीलदादा माने, आमदार अमल महाडीक, आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार तथा हॅन्डीकॅप बहुउददेशिय शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे अध्यक्ष राजीव आवळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तीकेयन यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते


दिव्यांग बांधवांसाठी विशेष साहित्य वाटपाचे आयोजन...
Total Views: 64