बातम्या
सातवे गावात मोफत महा-ई सेवा शिबिराचे आयोजन
By nisha patil - 10/2/2025 7:10:13 PM
Share This News:
सातवे गावात मोफत महा-ई सेवा शिबिराचे आयोजन
कोल्हापूर - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातवे गावात मोफत महा-ई सेवा शिबिर व शिवकार्य सदस्य नोंदणीचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आभा कार्ड, पॅन कार्ड, श्रम कार्ड, किसान कार्ड, मतदान ओळखपत्र व आधार कार्डशी संबंधित विविध सेवांचा लाभ नागरिकांना मोफत देण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक दादासो जाधव, शिवाजी पाटील, रामदास निकम व नाना ततोबा जाधव (गोसावी) यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाचे आयोजन शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख अनिल काळे, उपतालुका प्रमुख दीपक घोरपडे आणि उपसंघटक महेंद्र पाटील यांनी केले.
या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संतोष जाधव व विभागप्रमुख सुनील पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच निरंजन पाटील, ऋषिकेश पाटील, ऋषिकेश जाधव, राजवर्धन दळवी, उमेश भोरे यांनी विशेष सहकार्य केले. शिवसेना महिला पदाधिकारी सौ. ज्योती चौगुले आणि सौ. रेश्मा पाटीलही उपस्थित होत्या.
सातवे गावात मोफत महा-ई सेवा शिबिराचे आयोजन
|