विशेष बातम्या
महाशिवरात्री निमित्त इचलकरंजीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
By nisha patil - 2/26/2025 8:44:36 PM
Share This News:
महाशिवरात्री निमित्त इचलकरंजीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
नागरिकांचा या शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद......
इचलकरंजीत महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुरूहिनशेट्टी भवन इचलकरंजीत भरविण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन आ.राहुल आवाडेंच्या शुभहस्ते संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात अनेक तज्ज्ञ डॉक्टर्सच्या उपस्थितीत विविध तपासण्या व आरोग्य सेवा देण्यात आल्या. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊन त्यांना योग्य आरोग्य मार्गदर्शन मिळाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत समाजासाठी असे उपयुक्त उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी भावना आ.राहुल आवाडेंनी व्यक्त केली.
महाशिवरात्री निमित्त इचलकरंजीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
|