बातम्या
उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन...
By nisha patil - 5/2/2025 1:34:10 PM
Share This News:
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने व्यापारी उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. अमल महाडिक उपस्थित होते..
व्यापारी-उद्योजकांचे प्रश्न शासन स्तरावर मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी सदैव कार्यरत राहीन असा विश्वास आ.अमल महाडिकांनी या प्रसंगी उपस्थितांना दिला. कोल्हापूर शहराची उद्योग नगरी ही ओळख अधिक ठळक बनवण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्याची ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिलीय. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, प्रशांत शिंदे,अजित कोठारी, राहुल नष्टे यांच्यासह व्यापारी आणि उद्योजक उपस्थित होते.
उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन...
|